ब्लॉग लेखकांनीच लिहायला हवा असा नाही. एखादा ठराविक विषय घेवून, त्यावर सातत्याने लिहीणारे अनेक ब्लॉग्ज जसे आहेत त्याचप्रमाणे वेगवेगळ्या लेखकांची मोट बांधून त्यांच्याकडून त्यांच्या कौशल्याचे लिखाण मागवून प्रकाशित करणारे ब्लॉग देखील असतात.

नुसतं एखाद्या विषयावर काम करणं हेच उद्दीष्ट न ठेवता आपल्या व्यवसायाचा प्रसार करणारे, त्यामार्फत आपल्या ग्राहकांपर्यंत पोचणारे, ग्राहकांच्या तक्रारी निवारण करू इच्छिणारे, आपल्या व्यवसायातली भरीव कामगिरी लोकांपर्यंत पोचवणारे देखील ब्लॉग असतात.

ब्लॉगचा ब्लॉग म्हणून वापर न करता डोमेन नेम देऊन आणि रंगरूप बदलून वेबसाइटचे स्वरूप देणारे ब्लॉग देखील असतात.

थोडक्यात, आपल्या ब्लॉगमार्फत आपण आपल्या स्वतःला किंवा आपल्या व्यवसायाला प्रेझेंट करत असतो. ते आपले ऑनलाइन अस्तित्व असते. आपण समोर हजर नसताना, आपल्या उत्पादनाविषयी अथवा सेवेविषयी अधिक माहिती आपल्या ग्राहकांना ब्लॉगमार्फत मिळू शकते.

काही ब्लॉग्ज हे खास आमंत्रितांकरता असतात तर काही सार्वजनिक असले तरी देखील त्यातल्या निवडक पोस्ट्स पासवर्ड देऊन संरक्षित केलेल्या असू शकतात.

एकाच पानाचा वेबसाइट सदृश ब्लॉग बनवावा की मल्टीपेज ब्लॉग बनवावा हे अर्थातच आपल्या ग्राहकांना काय माहिती पुरवायची आहे यावर अवलंबून आहे.


You may want to read following Posts related to same topics :-

Advertisements