blog-audience-1024x204कालच्या माझ्या पोस्टवर प्रशांत यांनी, “इंजिनिअर्सनी पण ब्लॉग सुरू करायला हवा” अशी प्रतिक्रीया दिली. त्यावर त्यांना मी ” काहीच हरकत नाही…. ज्यांना ज्यांना काही सांगावेसे वाटते, लिहावेसे वाटते त्यांनी त्यांनी ब्लॉग माध्यमाचा आधार घेऊन ते मांडायला हवे. तुमच्या म्हणण्याप्रमाणे इंजिनिअर्सनी देखील ब्लॉग लिहायला सुरूवात करावी, आपल्या शिक्षणाबद्दल लिहावे, करिअर मधल्या अडचणीविषयी लिहावे, त्यातून काढलेल्या मार्गाविषयी लिहावे. एक प्रकारे तुमच्याच मार्गावर चालू इच्छिणा-यांना ते डॉक्युमेंटेशन ठरेल.” असे उत्तर दिले. माझे मत आजही हेच आहे की, एखादया लेखनाला साहित्यिक मूल्य आहेत की नाही याचा विचार न करता जे वाचायला आवडते ते वाचक वाचतात. त्यामुळे आपले लेखन कुणी वाचेल का? कुणी प्रकाशक ते छापेल का? अश्या विचारांत न अडकता जे व्यक्त करावेसे वाटते ते व्यक्त करायला आपण नावाजलेले लेखकच असायला हवे असे काही नाही.

लेखक मंडळींना ब्लॉगचा उपयोग आपल्या लेखनाकरता अश्या प्रकारे करता येईल.
– आपले पूर्वीचे लेखन इथे साठवण्याकरता,
– चालू असलेल्या लेखनातला काही भाग इथे देऊन वाचकांची उत्सुकता चाळवणे, त्यावर वाचकांची मते मागवणे, एक/अनेक प्रकाशकांना त्या लेखनाचा दुवा देऊन त्यांचे मत आजमावणे,
– ब्लॉगवरून आपल्या साहित्याची विक्री करणे.
– ब्लॉग माधम्याद्वारे स्वत:ला प्रमोट करणे.
– वाचकांशी संपर्कात रहाणे. इ.

बहुतेक मराठी वृत्तपत्रातले स्तंभलेखक वर्षभर लिहून त्यानंतर त्या लेखांचे एकत्रित पुस्तक छापून आणतात. याउलट बहुसंख्य इंग्रजी वृत्तपत्रातले लेखक मुळातच ब्लॉगर असतात. त्यांचे ब्लॉग्ज वाचून त्यांना ही स्तंभलेखनाची संधी मिळालेली असेल ही शक्यता देखील नाकारता येत नाही.

मराठी पुस्तकांना वाचक नाही अशी ओरड करण्यापेक्षा वाचकांना हवी त्या स्वरूपात पुस्तक मिळाली तर वाचक मराठी नक्कीच वाचतील. स्मार्टफोनच्या वापरामुळे रिसपॉन्सिव्ह साइट्सचे प्रमाण वाढते आहे. ब्लॉग हे रिस्पॉन्सिव्ह साइटचेच एक रूप आहे, त्याचा स्वत:च्या प्रमोशनकरता कसा फायदा करून घ्यायचा हे मात्र मराठी लेखकांनी शिकून घ्यायला हवे.


You may want to read following Posts related to same topics :-

Advertisements