शोधा

Digital Solutions for YOUR Business

A Helping Hand to Small Businesses to Promote Themselves via Internet

श्रेणी

E Magazines

ब्लॉगिंगकरता मदत हवी आहे?

मराठी भाषेत साहित्यिकांचा दुष्काळ नाही. प्रश्न आहे तो प्रकाशकांचा. ब्लॉगच्या माध्यमातून प्रकाशनाचा देखील प्रश्न सुटला आहे. संगणकावर मराठी टंकू शकता ना! बर्‍यापैकी लिहू देखील शकता की! मग काढा ब्लॉग स्वत:चा! कशाला आपलं लेखन कुणी प्रकाशित करावं म्हणून पाय धरायचे प्रकाशकांचे. वर ते देखील उपकार केल्याच्या थाटात, आपल्याकडूनच पैसे घेऊन प्रती छापून घेणार…..त्यातल्या काही आपल्या हातावर टेकवून उरलेल्या स्वत: विकून खायला मोकळे. त्यापेक्षा आपणंच आपले लिखाण आपल्याला हवे तसे का नाही प्रकाशित करावे? काही साहित्यिक पुरस्कार मिळालेल्या साहित्यिकांचे असे देखील म्हणणे आहे की, सगळे लेखन साहित्य म्हणून मोडत नाही आणि कोणीही लिहिणारा लेखक असू शकत नाही. अहो! संत सांगून गेले आहेत “राजहंसाचे चालणे मोठे सुंदर असेलही, पण म्हणून इतरांनी काय चालूच नये?”. साहित्यिक मूल्य बिल्य ठरवण्याची भाषा लेखकांनी करूच नये. त्यांचे स्वत:चे लिखाण देखील त्यांना प्रकाशकांना पैसे देऊनच छापावे लागते हे सत्य ते देखील नाकारू शकत नाहीत.

असो, तर मुद्दा काय की, आपल्याला काही तरी मांडायचे आहे, ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावे अशी इच्छा आहे. मग ब्लॉगवर का लिहू नये? आपल्यापैकी असे किती तरी जण आहेत जे उत्तम लिहू शकतात, आपणे म्हणणे योग्य शब्दांत मांडू शकतात, पण त्यांना ते ब्लॉगवर प्रकाशित करण्याचे तंत्र अवगत नाही. खास त्यांच्याकरता ही पोस्ट आहे. तुम्हाला ब्लॉगिंगकरता काही मदत हवी असल्यास मला संपर्क साधू शकता.

आपल्याला खालील कामात मी मदत करू शकेन.

पूर्णपणे नविन ब्लॉग तयार करणे.
आधीपासून असलेल्या ब्लॉगला नवे रूप देणे.
तुमच्या ब्लॉगबाबत एखादी पोस्ट या ब्लॉगवर प्रकाशित करणे.
तुमच्या ब्लॉगकरता ’कंटेंट राईटिंग’ करणे.
तुमच्या सहित्याचे ई-बुक बनवणे.

तुम्हाला या ब्लॉगवर जर ’गेस्ट पोस्टींग’ करायचे असेल तरीदेखील स्वागत आहे.

तुम्हाला नेमकी काय मदत अपेक्षित आहे ते मला लिहून पाठवा. खाली जो फॉर्म दिला आहे तो कृपया भरून पाठवा. आपल्याला मी नक्की संपर्क करीन.

Advertisements

अप्रकाशित लेख आणि कवितांना ’ईबुक्स’ नाहीतर ’ब्लॉग’ चा आधार

सोशल नेटवर्किंगचे माध्यम हाताशी असल्यावर प्रतिभेला धुमारे फुटणं नवीन नाही. कोणतीही घटना घडो…..भडाभडा बोलावे तसं आपली मतं लोक फेसबुकवर भसाभसा मांडत असतात. त्याची कुणी दखल घेतली नाही तर ज्या ग्रुपवर सभासद आहेत तिथे देखील आपल्या कविता, लेख असं काय काय मांडलं जातं. मग तिथून कोणीतरी ते साहित्य चोरतं आणि खुशाल आपल्या नावावर खपवतं. कधीतरी मूळ मालकाला पत्ता लागतो देखील पण आगपाखड करण्याशिवाय हातात काही राहिलेलं नसतं, कारण तोवर चोर त्या साहित्याचा मालक म्हणून प्रसिद्धीस आलेला असतो.

ब-याचदा सोशल नेटवर्किंग वर या लेख / कवितांना इतका तुफान प्रतिसाद मिळतो की, त्यांचं एखादं पुस्तक प्रकाशित करण्याची खुमखुमी येते. मराठी वाचक आपलं पुस्तकं विकत घेऊन वाचत आहेत, इतरांना भेट देत आहेत 🙂 असं स्वप्नरंजन ते करायला लागतात देखील. पण प्रत्यक्षात वस्तुस्थिती अगदी वेगळी असते. पुस्तकं कितीही ताकदीचं असो,  नवलेखकांना ते पुस्तक पदरमोड करूनच पुस्तकं छापावं लागतं, हे कोणताही लेखक अमान्य करू शकणार नाही.

माझ्या ओळखीतल्या एका वयस्कर आजोबांनी एका इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद केला. ते पुस्तक हिंदू धर्माविषयी होतं त्यामुळे सरसकट वाचक त्याला मिळतीलच असे नव्हते. त्यांच्या ओळखीच्याच एका प्रकाशकांनी त्याच्या एक हजार कॉपीज काढायची तयारी दाखवली त्याकरता त्या आजोबांकडून सत्तर हजार घेतले, पुस्तकाची किंमत रु.३००/- प्रत्येकी अशी छापली आणि एकूण हजार कॉपीज पैकी फक्त तीनेशी प्रती त्यांच्या हातावर टेकवल्या. आता ते आजोबा कुठे ती तीनशे पुस्तके विकायला जाणार? बरं, प्रकाशकांना काहीही न करता हातात रू.३००/- प्रत्येकी वाल्या सातशे कॉपीज मिळाल्या त्या सगळ्या अगदी सवलतीने रू.१००/- ला जरी दुकानात विकल्या तरी प्रकाशकांना त्यात रू.७०,०००/- चा फायदा झाला. मूळ छपाईचा खर्च आजोबांकडून वसून केलाच होता.  त्या सातशे प्रती विकल्या जरी नाही गेल्या तरी रद्दीत विकून काही पैसे तरी प्रकाशक कमावू शकतोच. आणि कुणी सांगावे त्यांनी एकूण हजार प्रती छापल्या असतील तरी का? कदाचित कराराप्रमाणे फक्त ३०० प्रती काढून आजोंबाना दिल्या असतील. सहाजिकच सातशे प्रती छापायचा खर्च कमी आणि त्या विकायची यातायात पणी नाही.

अश्या घटना पाहील्या; की वाटतं माणसं मोफत किंवा कमी खर्चाच्या सोई उपलब्ध असताना उगाचच भरमसाठ खर्चाच्या मागे का धावत बसतात ? आधी डिजिटल पुस्तक काढून, किती प्रतिसाद मिळतोय हे पाहून  मग ते छापाता येईल.

मला असे वाटते की दोन पर्याय आहेत.

१)छापील पुस्तक काढण्यापेक्षा आधी डिजिटल पुस्तक (pdf format) काढून पहावे.

  • माफक किंमतीत विकायला ठेऊन ते डाऊनलोड करू न देता किंवा पासवर्ड टाकून डाऊनलोड करू देता तुम्ही जनमत आजमाऊ शकता. तुफान विकलं जातयं हे लक्षात आले तर छापता देखील येईल.

२) pdf चा पर्याय मान्य नसेल तर तुमच्या निवडक/लेखांचा लेखांचा ब्लॉग तयार करता येईल. ब्लॉगचा फायदा असा की….

  • डोमेन न घेता मोफत ब्लॉग सुरू करता येईल,
  • तुमचा तुम्हाला हवा तेव्हा हवा तसा अगदी ईमेलद्वारे देखील अपडेट करता येईल.
  • आजकाल साहित्य चोरी सरसकट होत असल्याने काही उपाय योजून ब्लॉगवरचे लेख कॉपी करता येणार नाहीत अशी सोय (ही अर्थातच फ़ुलप्रुफ नाही, पण सामान्य वाचकाकडून कॉपी करणे टाळता येईल) करता येईल.
  • मर्यादीत लोकांनाच ब्लॉगवर प्रवेश देता येऊ शकेल. त्याकरता हवी तर तुम्ही माफक फी आकारू शकता.
  • त्याखेरीज तुमच्या पोस्ट्स देखील पासवर्ड प्रोटेक्टेड ठेवू शकता.

काही मार्गदर्शन हवे असल्यास अवश्य संपर्क साधा.


You may want to read following Posts related to same topics :-


Create a free website or blog at WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: